• पालिकेची कामं अर्धवट
  • पालिकेची कामं अर्धवट
SHARE

मालाड - मालाड पश्चिमेकडील लिंक रोडवर असलेल्या फुटपाथवरील झाडांची काही दिवसांपूर्वी पालिकेनं छाटणी केली होती. पण, त्यांची मुळं आणि उखडलेल्या अवस्थेतील पेव्हर ब्लॉक तसेच पडून आहेत. हा फुटपाथ कधी दुरुस्त होईल असा सवाल स्थानिकांनी केला आहे. झाड तोडून पंधरा दिवस झाले तरी मुळं उचलण्यात आली नाहीत. तर, अशा अर्धवट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई का करत नाही असा सवाल देखील स्थानिक विनोद घोलप यांनी केला आहे. पण, याबाबत मालाडच्या पी उत्तर पालिका विभागाच्या सहायक आयुक्त संगीत हसनाले यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या