Advertisement

बिबट्याच्या हल्ल्यात वन रक्षकाचा मृत्यू

बोरीवलीच्या संजय गांधी उद्यानात सुरक्षेच्या दृष्टीने एसजीएनपीचे वन रक्षक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. गुरूवारी रात्री तुळशी तलावाजवळ वन रक्षकाचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला. याबाबत वन अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

बिबट्याच्या हल्ल्यात वन रक्षकाचा मृत्यू
SHARES

बोरीवलीच्या संजय गांधी उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वन रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. तुळशी तलावाजवळ 'एसजीएनपी'च्या वन रक्षकाचा मृतदेह आढळला स्वस्तिक काटकर असं या वन रक्षकाचं नाव असून पेट्रोलिंग करत असताना तुलसी तलावाजवळ त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे.


तुळशी तलावाजवळील घटना

बोरीवलीच्या संजय गांधी उद्यानात सुरक्षेच्या दृष्टीने एसजीएनपीचे वन रक्षक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. गुरूवारी रात्री तुळशी तलावाजवळ वन रक्षकाचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला. याबाबत वन अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.


मृतदेहावर नखांच्या खुणा

या वन रक्षकाच्या मृतदेहाचे काही अवयव बिबट्याने खाल्ले असून मृतदेहावर विविध ठिकाणी नखांनी ओरबाडल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. बुधवारी रात्री या वन रक्षकावर बिबट्याने हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.


अहवालाची प्रतिक्षा

हा हल्ला बिबट्याने केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अटाॅप्सी रिपोर्ट आल्यानंतर वस्तूस्थिती कळेल असं वन अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. या प्रकरणी बोरीवलीच्या कस्तुरबा पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



हेही वाचा-

दादरमधील पुरंदरे मैदानावरून शिवसेना आक्रमक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा