Advertisement

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन


मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन
SHARES

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं गुरुवारी पहाटे नागपूरमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. चंद्रशेखर धर्माधिकारी ९१ वर्षाचे होते. गुरुवारी पहाटे त्यांनी नागपुरातील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. चंद्रशेखर यांच्यावर नागपुरातील अंबझरी घाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत.


'पद्मभूषण' पुरस्कारानं सन्मानित

चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२७ रोजी मध्य प्रदेशातील रायपूर इथं झाला होता. नागपूरच्या चिटणीस पार्कजवळील प्राथमिक महापालिका शाळेत त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं होतं. स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना २००३ साली त्यांना 'पद्मभूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.


१७ वर्षे न्यायदानाचं कार्य

चंद्रशेखर यांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्तीपर्यंत तब्बल १७ वर्षे न्यायदानाचं कार्य केलं. दरम्यान, ते काही दिवस प्रभारी मुख्य न्यायमूर्ती होते. या काळात त्यांनी महिला, आदिवासी, लहान मुले, मनोरुग्ण, बंदिवान आदींच्या मूलभूत अधिकारांवर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले. त्याचप्रमाणं, चंद्रशेखर हे न्यायाधीशाबरोबरचं एक उत्तम लेखकसुद्धा होते. त्यांनी हिंदी, मराठी, गुजराती भाषेमध्ये पुस्तकं लिहिली आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा