Advertisement

'ह्या' क्रिकेटपटूने घेतला बिबट्या दत्तक

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आता माजी क्रिकेटपटू सरसावला आहे. बिबट्या दत्तक घेऊन त्यांनी वन्यजीव संरक्षणाचा संदेश दिला आहे.

'ह्या' क्रिकेटपटूने घेतला बिबट्या दत्तक
SHARES

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आता माजी क्रिकेटपटू संदीप पाटील सरसावले आहेत. संदीप पाटील यांनी संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील मादी बिबट्या दत्तक घेतला आहे. तारा नावाचा हा बिबट्या २० महिन्यांचा आहे. 

संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील प्राण्यांची काळजी घेत असलेल्या डाॅक्टरांच्या टीमबरोबर संदीप पाटील काम करत असतात. अनाथ असलेल्या तसंच सुटका केलेल्या प्राण्यांचं आरोग्य जपण्यासाठी ते डाॅक्टरांच्या टीमबरोबर झटत आहेत.  संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य हे सांभाळण्यासाठी सर्वात अवघड असलेले अभयारण्य आहे. मात्र, याकडं दुर्लक्ष होत आहे.

जास्तीत जास्त मुंबईकर या अभयारण्यात यावे आणि त्यांनी आपल्यापरीने मदत करावी, यासाठी संदीप पाटील अभयारण्यातील वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार आहेत. बिबट्या दत्तक घेऊन पर्यावरण जागृतीचा संदीप पाटील यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. संदीप पाटील म्हणाले की, मी वनविभागाच्या संपूर्ण टीमसोबत काम करणार आहे. त्याबद्दल उत्सूक आहे. उद्यानातील प्राण्यांसाठी मुंबईतल्या उद्योगपतींनी, सेलिब्रिटींनी पुढाकार घेऊन मदत करायला हवी.



हेही वाचा  -

२०० खड्ड्यांकडं पालिकेचं दुर्लक्ष

PMC बँक घोटाळा: उच्च न्यायालयाचे आरबीआयला 'हे' आदेश





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा