Advertisement

काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा आरे कॉलनीत वृक्षतोडीला विरोध

आरे कॉलनीतील वृक्षतोडीला माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी विरोध आहे

काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा आरे कॉलनीत वृक्षतोडीला विरोध
SHARES

मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी गोरेगाव येथील आरे कॉलनीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येणार आहे. या वृक्षतोडी आरे कॉलनीतील आणि इतर संस्था विरोध करत आहेत. अशातच आता या विरोध करणाऱ्या नागरिकांना माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पाठिंबा दिला आहे. मुंबई मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, आरे वसाहत, गोरेगाव येथील वृक्षांचं जतन करावं अशी मागणी नागरिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि महापालिका अधिकाऱ्यांकडं जयराम रमेश यांनी केली आहे.

परिस्थितीची जाणीव

जयराम रमेश यांनी याबाबत ट्विटवरून माहिती दिली आहे. 'मी देखील याच परिसरात लहानाचा मोठा झालो आहे. येथील परिस्थितीची मला जाणीव आहे. त्यामुळे या गोष्टीसाठी माझा मुंबईकरांना पूर्ण पाठिंबा आहे', असं त्यांनी लिहिलं आहे. तसंच, #SaveAareySaveMumbai असा हॅशटॅगही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये वापरला आहे.

झाडं तोडण्याला परवानगी

मेट्रो ३ प्रकल्पासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं आरे वसाहतीत प्रस्तावित कारशेड उभारण्यासाठी २७०० हून अधिक झाडं तोडण्याला परवानगी दिली. त्यामुळं विविध क्षेत्रातील नागरिकांनी राज्य सरकारला वृक्षतोडीच्या निर्णया विरोधात उलट उत्तर देण्यास सांगितलं आहे. तसंच, सध्या गणेशोत्सव सूरू असून अनेक सार्वजनिक मंडळं याबाबत जनजागृती करत आहेत.



हेही वाचा -

उरण ओएनजीसी प्लांटला भीषण आग, ५ जणांचा मृत्यू

गणेशोत्सव २०१९: सार्वजनिक मंडळांत 'तंबाखू मुक्त जीवना'चा संदेश



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा