SHARE

कमला मिल आग दुर्घटना ताजी असतानाच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास मैमून मेन्शन या निवासी इमारतीला आग लागली. या आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. हे सगळेजण एकाच कुटुंबातील आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.


आगीत चौघांचा मृत्यू

मैमून मेन्शन या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत असलेल्या कपासी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. तर, सात जण जखमी झाले अाहेत. त्यापैकी कपासी कुटुंबाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कोठारी कुटुंबातील चौघे जण जखमी झाले असून कटलरीवाला यांच्या कुटुंबातील १ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे मरोळ परिसरातील सर्वच जण हादरले आहेत.


आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांची नावं

या आगीत १४ वर्षीय सकिना आपासी कपासी, मोहिन अपासी कपासी (१०), तस्लिम अपासी कपासी (४२), दाऊद अली कपासी (८०) यांचा समावेश आहे. हे सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत. यामधील जखमी झालेल्या ७ जणांवर होली स्प्रीट रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांची प्रकृती स्थिर असल्याचं या रुग्णालयातल्या डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.


संबंधित विषय
ताज्या बातम्या