Advertisement

रायगड रोपवेला चौथी ट्रॉली जोडणार

गडावरून आता 48 प्रवासी एकाचवेळी चढ-उतार करणार आहेत.

रायगड रोपवेला चौथी ट्रॉली जोडणार
SHARES

रायगड किल्ल्यावर केवळ चारच मिनिटांत पोहोचण्याची सोय असलेल्या रायगड रोप-वेला आता चौथी ट्रॉली जोडली जाणार आहे. त्यामुळे गडावरून आता 48 प्रवासी एकाचवेळी चढ-उतार करणार आहेत. या कामामुळे शिवप्रेंमीमध्ये, तसेच पर्यटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी एक हजार चारशे पायऱ्या व दमछाक करणारा मार्ग असून या रस्त्यावरून चालणे व गड सर करणे अनेकांना कठीण होत असते. त्यामुळे रायगडावर जाण्यासाठी 1995-96 मध्ये रोप-वेची सुविधा सुरू करण्यात आली.

सुरुवातीला गडावर जाण्यासाठी दोन ट्रॉली व गड उतरण्यासाठी दोन ट्रॉली अशा चार ट्रॉलीत ये-जा करत असत. त्यानंतर मागील वर्षी यामध्ये एका ट्रॉलीची वाढ करण्यात आली होती. परंतु आता गडावर जाण्यासाठी चार ट्रॉली व उतरण्यासाठी चार ट्रॉली अशी सुविधा करण्यात आली आहे. संबंधित सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या रायगड रोप-वेच्या चौथ्या ट्रॉलीची सर्व प्रकारची तांत्रिक चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वीदेखील झाली आहे. असे असले तरीही 23 एप्रिलला या चौथ्या ट्रॉलीचे लोकार्पण केले जाणार आहे. यातून शिवप्रेमी व पर्यटकांना सुविधा दिली जाणार आहे.

रायगड किल्ल्यावर रोप-वेची सुविधा झाल्यानंतर गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. आता चौथी ट्रॉली जोडल्यामुळे पर्यटकांना थांबण्यासाठी जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.


तिकीट दर 
सिंगल
रिटर्न
समान्य नागरिक
200
310
ज्येष्ठ नागरिक 
नाही
200
लहान मूल तीन फुटपर्यंत
मोफत
मोफत
लहान मूल तीन ते चार फुटांपर्यंत
नाही
200
चार फुटाच्या वर
200
310
अपंग व्यक्ती
मोफत
मोफत
शालेय विद्यार्थी
130
190
आठवी ते बारावीपर्यंत
190
225हेही वाचा

वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी 'या' उपाययोजना करा

मुंबईतून विक्रमी 2127 मेगावॅट विजेची मागणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा