Advertisement

मोफत शिवभोजन थाळी योजनेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ

शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत १५ एप्रिल ते १७ जून या काळात ९० लाख ८१ हजार ५८७ मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.

मोफत शिवभोजन थाळी योजनेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ
SHARES

राज्य सरकारने राज्यातील गरीब जनतेला शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत (shiv bhojan Thali yojana) एक महिन्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. १५ एप्रिलपासून सुरु असलेली ही सुविधा आता १४ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन पाठवलेल्या नि:शुल्क थाळीच्या मुदतवाढीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

यासंबंधीचा शासन निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने १७ जून २०२१ रोजी निर्गमित केला आहे. शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत १५ एप्रिल ते १७ जून या काळात ९० लाख ८१ हजार ५८७ मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत ४ कोटी ७० लाख १८ हजार १८४ थाळ्यांचे वितरण झाले आहे.

राज्यात शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत ४४१ नवीन केंद्रांना मंजूरी देण्यात आली असून यामुळे प्रतिदिन थाळ्यांची संख्या ४४,३०० ने वाढली आहे. राज्यात आतापर्यंत १३३२ शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. नव्याने मंजूर केलेल्या ४४१ केंद्रापैकी काही केंद्रे सुरु झाली असून काही केंद्रे अल्पावधीतच सुरु होतील. आजघडीला राज्यात एकूण १०४३  शिवभोजन केंद्रे सुरु आहेत.



हेही वाचा - 

पुढच्या २ ते ४ आठवड्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येणार?; टास्क फोर्सची महत्वाची माहिती

मुंबईसाठी पुढील काही तास धोक्याचे; मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा