Advertisement

पेट्रोल-डिझेल दरात 'इतकी' वाढ

यंदा थर्टीफर्स्ट पार्टीसाठी बाहेरगावी जाणाऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ होणार आहे.

पेट्रोल-डिझेल दरात 'इतकी' वाढ
SHARES

मुंबईसह देशभरात मंगळवारी थर्टीफर्स्ट पार्टी करण्यात येणार आहे. थर्टीफर्स्टनिमित्त पार्टीसाठी कुठं जायचं याचं अनेकजण नियोजन करत आहेत. मात्र. यंदा पार्टीसाठी बाहेरगावी जाणाऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ होणार आहे. कारण देशांतर्गत पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल १६ ते १७ पैसे तर डिझेल प्रति लिटर १८ ते १९ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल ८०.६९ आणि डिझेल प्रति लीटर ७१. १२ रुपये आहे.

६५ डाॅलर

जागतिक कमोडिटी बाजारात क्रूड ऑइल (खनिज तेल) ६५ डाॅलर प्रति बॅरलपर्यंत वाढलं आहे. त्यामुळं तेल आयातीच्या खर्चात वाढ झाली आहे. परिणामी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलची भाववाढ केली आहे. मुंबईत पेट्रोल दरात सोमवारी १६ पैशांची वाढ झाली आहे. डिझेल १९ पैशांनी महागलं आहे.

पेट्रोलचा दर

इंडियन आॅइलच्या दरपत्रकानुसार मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लीटर ८० रुपये ६९ पैसे झाला आहे. डिझेल दर प्रति लीटर ७१ रुपये १२ पैसे आहे. दिल्लीत पेट्रोल ७५.०४ रुपये आणि डिझेलचा दर प्रति लीटर ६७.७८ रुपये आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोलसाठी ७७.७० रुपये आणि डिझेलसाठी ७०.२० रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. तसंच, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ७८. ०२ आणि डिझेल ७१. ६७ रुपये आहे.



हेही वाचा -

SBI कडून नवीन वर्षाची भेट, गृहकर्ज दरात कपात

मुंबईत मलेरियाचे ४ हजार, लेप्टोचे २६६ रुग्ण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा