SHARE

दादर - माहिती अधिकार कार्यकर्ते रामशंकर सरोज यांना पालिकेच्या जी-उत्तर कार्यालयात प्रवेशास बंदी घातल्याचा अजब प्रकार समोर आलाय. कोट्यावधीचा बनावट फोटोपास घोटाळा त्यांनी उघडकीस आणला होता. दादरच्या पालिका जी-उत्तर विभागातील वसाहत अधिकाऱ्यांचा याप्रकरणात हात असल्याचंही समोर आलं. याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात चौकशी सुरूये. पालिकेच्या सरकारी कामात अडचणी आणत असल्याचं कारण पुढे करत रामशंकर यांना प्रवेश नाकारावा अशी अजब मागणी पालिका अधिकाऱ्यांनी केली. यावर पालिका सहआयुक्तांनी वसाहत अधिकाऱ्यांची पाठराखण केली आणि रामशंकर सरोज यांच्या विरोधात आठवड्यातील दोन दिवस दोन तास केवळ कार्यालयात प्रवेश द्या असा अजब फर्मान काढला.

"रामशंकर हे कामाचा पाठपुरावा करण्यासाठी तासंतास अधिकाऱ्यांसोबत बसतात. त्यामुळे कामात अडथळा निर्माण होतो. म्हणून कोणतंही काम असल्यास त्यांनी थेट माझ्याशी संवाद साधावा," असं पालिका जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या