Advertisement

गणेशोत्सव २०१९: मुंबईत बाप्पाच्या विसर्जनावेळी ४१ जण जखमी

गिरगाव चौपाटी परिसरात बाप्पाला निरोप देताना वेगवेगळ्या घटनेत तब्बल ४१ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

गणेशोत्सव २०१९: मुंबईत बाप्पाच्या विसर्जनावेळी ४१ जण जखमी
SHARES

मुंबईसह राज्यभरातील सर्व गणेश भक्तांनी १० दिवस मुक्कामासाठी आलेल्या बाप्पाला ढोल-ताशांच्या गजरात नाचत गाजत निरोप दिला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, लेझिमच्या तालात, गुलाल उधळत राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', असा जयघोष करत गणरायचं विसर्जन करण्यात आलं. एकीकडे आनंदमय वातावरण तर दुसरीकडे काही गणेश भक्त जखमी झाल्याच्या घटना घडल्या. मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरात बाप्पाला निरोप देताना वेगवेगळ्या घटनेत तब्बल ४१ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. 

किरकोळ जखमी

बाप्पाला निरोप देताना जखणी झालेले हे ४१ जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचार करून सोडण्यात आलं. परंतु, एक जण या घटनेत फ्रॅक्चर झाल्याचं समजतं. दरम्यान, गणेश विसर्जनावेळी कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होतेमुंबईत तब्बल ५० हजार पोलीस तैनात करण्यात आले होतेया विसर्जन मिरवणुकांवर ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवण्यात आला होता.

९ हजार बाप्पांना निरोप

गुरूवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत ९ हजार बाप्पांना निरोप देण्यात आलात्यामध्ये ३८३ सार्वजनिक८९१८ घरगुती गणपतींसह ६४ गौरींचा समावेश होतासंध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास लालबागचा राजा चिंचपोकळी पुलावरून मार्गस्थ झाला. त्यावेळी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते.हेही वाचा -

समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी कर्ज मंजुरीची उद्दिष्ट्यपूर्ती, मुख्यमंत्र्यांची घोषणा

सुप्रिया सुळे टॅक्सी चालकावर संतापल्या अन् म्हणाल्या...Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा