Advertisement

नगरसेवक निधीतून कचरापेट्या हद्दपार!

मुंबई महापालिकेने पुढील ७ वर्षांकरीता कचरा वाहून नेण्यासाठी खासगी कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. कांदिवली, बोरीवली, दहिसर आणि मुलुंड या ४ भागांसाठी ३ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेने प्रायोगिक तत्वावर या ४ भागांसाठी कंत्राटदार नेमून कंत्राटदाराला कचरा वाहून नेण्यासाठी वाहनांसह कामगार त्यांच्यासाठी चौकी तसंच कचऱ्याच्या तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष आणि सोसायटींना कचरा पेट्याही उपलब्ध करून देण्याचं कंत्राट दिलं आहे.

नगरसेवक निधीतून कचरापेट्या हद्दपार!
SHARES

नगरसेवक निधीतून देण्यात येणाऱ्या १२० लिटर्स आणि २४० लिटर्सच्या कचरा पेट्यांचं वाटप यापुढे नगरसेवकांना करता येणार नाही. कारण महापालिकेने कांदिवली ते दहिसर आणि मुलुंड या भागातील कचरा उचलण्यासाठी खासगी कंत्राटदाराला कंत्राट दिलं असून यामध्ये संबंधित कंत्राटदारच सोसायट्यांना कचरापेट्या उपलब्ध करून देणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या कचरापेट्या महापालिकेने यापूर्वी खरेदी केलेल्या दरापेक्षा अधिक दराने कंत्राटदाराकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.


काय आहे जबाबदारी?

मुंबई महापालिकेने पुढील ७ वर्षांकरता कचरा वाहून नेण्यासाठी खासगी कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. कांदिवली, बोरीवली, दहिसर आणि मुलुंड या ४ भागांसाठी ३ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेने प्रायोगिक तत्वावर या ४ भागांसाठी कंत्राटदार नेमून कंत्राटदाराला कचरा वाहून नेण्यासाठी वाहनांसह कामगार त्यांच्यासाठी चौकी तसंच कचऱ्याच्या तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष आणि सोसायटींना कचरा पेट्याही उपलब्ध करून देण्याचं कंत्राट दिलं आहे.


कंत्राटदारातर्फे पुरवठा

मात्र, या कचरा कंत्राटात कंत्राटदारांनी दिलेल्या योजनेप्रमाणे व्हील बिन्सची संख्या महापालिकेच्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे कंत्राटदार ज्या १२० व २४० लिटर क्षमतेच्या कचरापेट्यांचा पुरवठा करणार आहेत, त्या कचरापेट्या नगरसेवक निधी तसंच महापालिका निधीतून खरेदी करून सोसायटींना उपलब्ध करून देण्यात यायच्या. परंतु आता या ४ विभागांमध्ये नगरसेवक तसेच महापालिका निधीतून कचरा पेट्यांची खरेदी न करता कंत्राटदारांमार्फतच त्या पुरवल्या जाणार आहेत.


किती किंमत?

यापूर्वी १२० लिटर क्षमतेच्या कचरापेट्या १२०९ रुपये, तर २४० क्षमतेच्या कचरा पेट्या १७९१ रुपयांना खरेदी करण्यात आल्या होत्या. परंतु नवीन कंत्राटात या कचरापेट्यांची किंमत अनुक्रमे २५०० रुपये ते ३००० रुपये एवढी दर्शवण्यात आलाी आहे. त्यामुळे जास्त दराने या कचरापेट्यांसाठी पैसे मोजण्यात येणार असल्याचं स्पष्ट होत आहे.



हेही वाचा-

कांदिवली ते दहिसर होणार कचरापेटीमुक्त

कचरा वर्गीकरण न केल्याने ११ सोसायट्यांना दंड



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा