कचऱ्याचं गाव...

 Malad
कचऱ्याचं गाव...

मालाड - मालाड पश्चिम मार्वे रोडमधील खारोडी गाव येथे वसलेल्या इनासवाडीला कचऱ्याच्या विळख्याने ग्रासले आहे. या परिसरात कचरा फेकण्याची व्यवस्था नसल्यामुळे कचऱ्याचा ढीग साचला आहे. दत्तक वस्ती योजनेअंतर्गत काम करणारे कर्मचारी कचरा उचलण्यासाठी रोज येत नाहीत. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. ऐन पावसाळ्यात येथे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार तक्रार करुनही पालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Loading Comments