मढ वटारगल्ली समुद्रकिनारी कचऱ्याचं साम्राज्य

 Madh Island
मढ वटारगल्ली समुद्रकिनारी कचऱ्याचं साम्राज्य
मढ वटारगल्ली समुद्रकिनारी कचऱ्याचं साम्राज्य
See all

मालाड - एकीकडे मुंबई महानगरपालिका स्वच्छ मुंबई सुंदर मुंबईचा संदेश देते, तर दुसरीकडे मढच्या कोळीवाडा वटारगल्ली समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेकडे पी उत्तर पालिका विभाग दुर्लक्ष करत आहे. या समुद्र किनाऱ्याच्या प्रवेशद्वारीच मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. कचऱ्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली असून डासांचं प्रमाणही वाढलंय. दररोज कचरा उचलण्यास गाडी येत नसल्यामुळे ढीग साचल्याचं स्थानिक नागरिक विक्रम कपूर यांनी सांगितलं. मात्र तेथे रोज कचरा उचलणारी गाडी जात असल्याचं पी उत्तर, घनकचरा विभागाकडून सांगण्यात आलं.

Loading Comments