गेटवे ऑफ इंडिया नागरिकांसाठी ४ दिवस बंद ; समुद्रमार्गे जाणा-या 'या' बोटींच्या फे-या रद्द

मुख्य कार्यक्रम हा नौदल दिनी संध्याकाळी होईल. त्याआधी तीन दिवस म्हणजेच १ ते ३ डिसेंबरदरम्यान नौदलाचा दुपारी ४.३० वाजल्यापासून सराव असणार आहे.

गेटवे ऑफ इंडिया नागरिकांसाठी ४ दिवस बंद ; समुद्रमार्गे जाणा-या 'या' बोटींच्या फे-या रद्द
SHARES

मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे गेट-वे आफ इंडिया नौदलाच्या कार्यक्रमामुळे ४ दिवस बंद राहणार आहे.  नौदलाचा हा कार्यक्रम १ ते ४ डिसेंबरपर्यंत गेट वेवर होणार आहे. मात्र त्यामुळे अलिबाग, मांडवा, एलिफंटाला जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून त्यांना पर्यायी भाऊचा धक्का येथून प्रवास करावा लागणार आहे.

 

मुंबईच्या गेट-वे आॅफ इंडियाला दरदिवशी शेकडो नागरिक, परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. त्या ठिकाणच्या बंदरावरून अलिबाग, मांडवा, एलिफंटाला जाण्यासाठी लॉन्च व  बोटी सुटतात. मात्र ४ डिसेंबरला नौदल दिनाच्या निमित्ताने गेट वे ऑफ इंडिया परिसरात 'बिटिंग द रीट्रीट' या कार्यक्रमाचा सराव होणार आहे. त्या कारणास्तव गेट वे ऑफ इंडिया नागरिक आणि पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे.  मुख्य कार्यक्रम हा नौदल दिनी संध्याकाळी होईल. त्याआधी तीन दिवस म्हणजेच १ ते ३ डिसेंबरदरम्यान नौदलाचा दुपारी ४.३० वाजल्यापासून सराव असणार आहे. त्यामुळेच 'गेट वे' वरून मांडवा तसेच एलिफंटासाठी लॉन्च आणि बोटी सुटणार नसल्याचे सांगण्यात आले.


नागरिकांची गैरसोय होऊ नये या दृष्टीकोनातून  काही ऑपरेटर्स भाऊचा धक्का (फेरी व्हार्फ) येथून या बोटी सोडू शकतात, असे मुंबई पोर्ट ट्रस्टने स्पष्ट केले आहे. पण भाऊच्या धक्क्यावर मासेविक्री होत असल्याने तेथे मच्छिमा-यांची आणि ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. त्यातच आता १ ते ४ डिसेंबवर दरम्यान तर बोटीही तिथेच सुटू लागल्या तर तेथे खूपच वर्दळ पाहायला मिळणार असून नागरिकांनी नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

संबंधित विषय