घाटकोपरमध्ये भिकारी आणि गर्दुल्ल्यांसमोर प्रशासन हतबल

Ghatkopar
घाटकोपरमध्ये भिकारी आणि गर्दुल्ल्यांसमोर प्रशासन हतबल
घाटकोपरमध्ये भिकारी आणि गर्दुल्ल्यांसमोर प्रशासन हतबल
See all
मुंबई  -  

घाटकोपर - प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या घाटकोपर रेल्वे स्थानकालगत असलेल्या स्कायवॉकवर भिकारी, प्रेमीयुगुल आणि गर्दुल्ल्यांचे अधिराज्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संध्याकाळच्या वेळी गर्दुल्ल्यांंचा वावर अधिक दिसून येत आहे.

गर्दुल्ल्यांमुळे संध्याकाळच्या वेळीस या स्कायवॉकवरून नागरिक जाणे टाळतात. तर अनेकदा तक्रार केली असून यांच्यावर कारवाई करून देखील यांना काहीच फरक पडत नसल्याचे घाटकोपर आरपीएफचे उपनिरीक्षक ब्रजेश कुमार यांनी सांगितले. तर गर्दुल्ल्यांमुळे सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचे प्रवासी सुवास चाळके यांनी सांगितले. या सर्व प्रकाराबद्दल एन वॉर्डच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.