Advertisement

ठाणे महापालिकेची लस खरेदीसाठीची जागतिक निविदा अखेर बासनात

कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता.

ठाणे महापालिकेची लस खरेदीसाठीची जागतिक निविदा अखेर बासनात
SHARES

कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) खरेदीसाठी काढलेली जागतिक निविदा (global tender) अखेर ठाणे महापालिकेने रद्द केली आहे. निविदेला दोन वेळा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने ठाणे महापालिकेला (thane Municipal Corporation) ही निविदा बासनात गुंडाळावी लागली

कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता. पाच लाख लसींसाठी ५० कोटी रुपयांची जागतिक निविदा काढली होती. २६ मे पासून ही निविदा बोली लावण्यासाठी खुली करण्यात आली होती. त्यानुसार यासाठी ८ जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती. 

मुंबई महापालिकेप्रमाणे ठाणेकरांना मुबलक लस मिळावी या उद्देशाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेने देखील जागतिक निविदा काढावी असे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेने ही निविदा काढली. त्यानुसार उत्पादन क्षमता असलेल्यांनाच यात सहभागी होता येईल, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक या लसींचे उत्पादक, त्यांचे भारतातील भागीदार, पुरवठादार, वितरक यांनाच निविदा भरता येणार होती. 

 निविदा भरण्याची अंतिम मुदत ८ जूनपर्यंत होती. या मुदतीत लसपुरवठा कंपन्यांकडून निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे निविदेला आणखी सात दिवसांची मुदत वाढ देण्यात आली. १६ जूनपर्यंत निविदा भरण्याची अंतिम तारीख होती. या मुदतवाढीनंतरही लसपुरवठा कंपन्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या निविदेला पालिकेने तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली नाही. अखेर  पालिकेने ही निविदा प्रक्रिया गुंडाळली.



हेही वाचा -

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात लसीकरणाचा विक्रमी उच्चांक

डेक्कन एक्स्प्रेस 'विस्टाडोम'सह २६ जूनपासून पुन्हा धावणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा