Advertisement

आर. के. स्टुडिओ होणार आता 'या' कंपनीचा?

आर. के. स्टुडिओमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून स्टुडिओचा देखभाल खर्चही निघत नसल्यानं कपूर कुटुंबाने हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे.

आर. के. स्टुडिओ होणार आता 'या' कंपनीचा?
SHARES

बाॅलिवूडशी घनिष्ट नातं असलेल्या आर. के. स्टुडिओची मालकी लवकरच कपूर कुटुंबाच्या हातातून दुसऱ्या मालकाकडे जाणार आहे. आर. के. स्टुडिओच्या देखभालीचा आता खर्च परवडत नसल्याचं म्हणत कपूर कुटुंबीयांनी स्टुडिओ विकायला काढला आहे. गोदरेज प्राॅपर्टीज हा स्टुडिओ खरेदी करण्यास इच्छुक असून यासंदर्भात प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाल्याचंही कळत आहे.


सुवर्णकाळाचा साक्षीदार

चेंबूर इथं ७० वर्षांहून अधिक काळ उभ्या असलेला आर. के. स्टुडिओ म्हणजे बाॅलिवूडच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार. या आर. के. स्टुडिओने एक से बढकर एक सुपरहिट सिनेमे बाॅलिवूडला दिले आहेत. हा स्टुडिओ म्हणजे कपूर कुटुंबाचा एेतिहासिक वारसा. पण हा एेतिहासिक वारसा आता इतिहासजमा होणार आहे. कारण या स्टुडिओमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून स्टुडिओचा देखभाल खर्चही निघत नसल्यानं कपूर कुटुंबाने हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे.


स्टुडिओ विकण्याची प्रक्रिया

या निर्णयानुसार कपूर कुटुंबाकडून स्टुडिओ विकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक उद्योगपती आणि बिल्डर हा स्टुडिओ विकत घेण्यासाठी उत्सुक आहेत. पण कपूर कुटुंबाची मुंबईतील प्रसिद्ध कंपनी गोदरेज प्राॅपर्टीज यांच्याशी चर्चा झाली असून ही त्यांना हा स्टुडिओ विकण्यात येईल, अशी दाट शक्यता आहे.


किती रुपयांना विकणार?

कपूर कुटुंबीयांनी स्टुडिओची किंमत २५० कोटी रुपये लावली आहे. परंतु बिल्डर १५० कोटी रुपयांना हा स्टुडिओ मागत आहेत. परंतु  १७५ कोटी रुपयांच्या विक्री व्यवहारावर शिक्कामोर्तब झाल्याचीही माहिती समोर येत आहे. दिवाळीनंतर स्टुडिओचं रजिस्ट्रेशन करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळं लवकरच आर. के. स्टुडिओला नवीन मालक मिळणार हे नक्की.



हेही वाचा-

शोमॅन राज कपूर यांचा आयकाॅनिक आर. के. स्टुडिओ विकणार!

आर.के. स्टुडिओची एनओसी रद्द, अग्निशमन दलाकडून कारणे दाखवा नोटीस



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा