गोकुळ शॉपिंग सेंटर सील, मागच्या बजूने मात्र दुकान सुरू


  • गोकुळ शॉपिंग सेंटर सील, मागच्या बजूने मात्र दुकान सुरू
  • गोकुळ शॉपिंग सेंटर सील, मागच्या बजूने मात्र दुकान सुरू
  • गोकुळ शॉपिंग सेंटर सील, मागच्या बजूने मात्र दुकान सुरू
SHARE

कर न भरल्याने बोरीवली (प.) येथील गोकुळ शॉपिंग सेंटरला पालिकेच्या आर मध्य विभागाने सील ठोकले आहे. पण मागच्या बाजूला असलेल्या गेटचे टाळे तोडत दुकानदारांनी दुकान पुन्हा सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे बोरीवली पश्चिमेकडील एसव्ही रोडवर असलेल्या गोकुळ शॉपिंग सेंटरच्या मालकाने 73 लाखांचा मूल्यांकन कर भरला नसल्याने पालिकेच्या आर मध्य विभागाने शॉपिंग सेंटर  सील केले आहे. 14 एप्रिलला या शॉपिंग सेंटरच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे लागले होते. मात्र त्याचा मागील गेट खुले असून तेथे शॉपिंग सुरू होते. मात्र या संदर्भात शॉपिंग सेटंरचा कोणताच दुकानदार काहीही माहिती देण्यास तयार नाही.

सुरक्षारक्षकाने सांगितल्याप्रमाणे मागच्या गेटचे टाळे तोडून शॉपिंग सेंटर चालवले जात आहे. याबाबत पालिकेच्या आर मध्य विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या