तुम्हे मालूम नहीं मैं कौन हूँ ?

    मुंबई  -  

    भाईंदर - भाजपा खासदार गोपाळ शेट्टी वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. गोपाळ शेट्टी यांनी भाईंदर येथील रिलायंस एनर्जी ऑफिसला भेट दिली. घोडबंदर येथे राहणाऱ्या कोळी बांधवाच्या वीज कनेक्शनसाठी त्यांनी ही भेट दिली. त्यावेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांना गोपाळ शेट्टी यांनी बाहेर जायला सांगितले. पत्रकारांनी नकार देताच खासदारांचा आवाज चढला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना धमकावण्यास सुरुवात केली. 'तुमको जो निगेटिव स्टोरी करना है कर, बोल गोपाल शेट्टी ने कायदा हाथ में लिया, जिसको बोलना हो बोल दे, तुम्हे मालुम नहीं मै कौन हूं, अशा शब्दात गोपाळ शेट्टी यांनी पत्रकरांना धमकावण्यास सुरुवात केली.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.