Advertisement

गणेशोत्सव २०१९: जीएसबी गणेशोत्सव मंडळ प्लास्टिक बाटल्यांचा पुर्नवापर करणार

मंडळाकडून पाणी पिऊन झाल्यानंतर इथेच बाटल्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. हा उपक्रम खेतवाडीचा सम्राटने ही राबवला आहे. पास्टिकचा वापर टाळण्यासाठी या मंडळाने आगमन सोहळ्याच्या वेळी प्लास्टिकच्या बाटल्या गोळा केल्या होत्या.

गणेशोत्सव २०१९: जीएसबी गणेशोत्सव मंडळ प्लास्टिक बाटल्यांचा पुर्नवापर करणार
SHARES

राज्यात प्लास्टिक बंदी असली, तरी त्याची फारशी अंमलबजावणी नागरिक करताना दिसत नाहीत. प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन गौड सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळ (जीएसबी) हे प्लास्टिकचा वापर जास्तीत जास्त टाळावा अशी जनजागृती करणार आहे. प्लास्टिकच्या बाटल्या क्रॅश करून त्याचा वापर घरबांधणीसाठी लागणाऱ्या वीटा कशा तयार करतात, याचा डेमो मंडळातर्फे दाखवला जाणार आहे. 

बाटल्यांची विल्हेवाट

मुंबईचा सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीएसबी मंडळाला गणेशोत्सवात दर दिवशी हजारो भाविक भेट देतात. त्यावेळी सर्व भाविकांना प्रसाद म्हणून मंडळाकडून भोजणाची व्यवस्था केलेली असते. भाविकांना तहान लागल्यास पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था असते. मात्र हजारो बाटल्यांमुळे परिसर अस्वच्छ होत आहेच. त्याचबरोबर पर्यावरणाचा प्रश्नही उपस्थित होत असल्याने मंडळाकडून पाणी पिऊन झाल्यानंतर इथेच बाटल्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. हा उपक्रम खेतवाडीचा सम्राटनेही राबवला आहे. प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी या मंडळाने आगमन सोहळ्याच्या वेळी प्लास्टिकच्या बाटल्या गोळा केल्या होत्या.

क्रेशर मिशनद्वारे क्रॅश

या पाण्याच्या बाटल्या क्रेशर मिशनद्वारे क्रॅश करून ते प्लास्टिक बांधकामात वापरण्यात येणार आहे. याचे प्रात्यक्षिक मंडळातर्फे भाविकांना दाखवून जनजागृती केली जाणार आहे. त्याचबरोबर प्लास्टिकच्या वस्तू कमीत कमी वापरण्याबाबत आवाहन केलं जाणार आहे.



हेही वाचा  -

मुंंबईत 'स्ट्रीट पार्किंग' ची नवी संकल्पना, पार्किंगसाठी शुल्क आकारणार

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी वाहतूक महामार्ग पोलिस सज्ज




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा