गटाराची सफाई होणार कधी?

 Paydhuni
गटाराची सफाई होणार कधी?

व्ही. व्ही. चंदन स्ट्रीट - मस्जिदच्या झवेरी भवन या इमारती जवळ बीएमसीच्या गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. या गटाराची वेळोवेळी साफसफाई केली जात नसल्याने गटाराचे पाणी मागील एका आठवड्यापासून रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तक्रार करूनही पालिकेने अजून याची दखल घेतली नसल्याचे स्थानिक नागरिक अब्दुल अंसारी यांनी सांगितले.

Loading Comments