Advertisement

गटाराचे सांडपाणी रस्त्यावर


गटाराचे सांडपाणी रस्त्यावर
SHARES

चेंबुर- चेंबुरच्या ठक्कर बाप्पा कॉलनी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून गटाराचं सांडपाणी रस्त्यावर वाहतंय. त्यामुळे परिसरातील दुकानदारांसह वाहन चालकांना याचा त्रास होतो. पालिकेकडून अनेक वर्ष या गटाराची सफाईच केली गेली नाही. परिणामी हे गटार पूर्णपणे तुंबलं, आणि आता या गटाराचं सांडपाणी रस्त्यावर वाहतंय. याबाबत दुकानदारांनी अनेकदा पालिकेला तक्रारी दिल्या, मात्र पालिका कर्मचारी केवळ नावापुरतीच याठिकाणी सफाई करून जातात. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा जैसे थे परिस्थिती पहायला मिळते. त्यामुळे पालिकेने यावर कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी दुकानदारांनी केलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा