गटाराची झाकणे तुटलेल्या अवस्थेत

 Goregaon
गटाराची झाकणे तुटलेल्या अवस्थेत
गटाराची झाकणे तुटलेल्या अवस्थेत
गटाराची झाकणे तुटलेल्या अवस्थेत
See all

गोरेगाव - कोरल पार्क, पेरू बाग आणि आरे रोड परिसरातल्या नाल्यावरची झाकणे तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आरे रोडच्या फुटपाथवरती पालिकेने पावसाळ्यात नाल्याला झाकणे लावली होती. मात्र ती झाकणे निकृष्ट दर्जाची असल्यामुळे काही महिन्यातच तुटली. काही झाकणे मधोमध तुटली आहेत. त्यामुळे पालिकेने या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केले हे दिसून येते, असा आरोप नागरिक करत आहेत. येथील दुकानदारांनी वारंवार पालिकेला तक्रार करून सुद्धा पालिका लक्ष देत नाही. त्यामुळे रहिवाशांनी गटारावर फ्लाउड टाकून रस्ता केला आहे, असे दुकानदार गुप्ता यांनी सांगितले. या संदर्भात पालिकेचे अधिकारी तेजल पिंपळे यानी लवकरच नवीन आणि चांगल्या दर्ज्याची झाकणे लावण्यात येतील, असे आश्वासन दिले.

Loading Comments