Advertisement

मुंबई पालिकेतील बायोमेट्रीक हजेरीला विरोध, कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई महापालिकेने आरोग्य कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. मात्र, याला कर्मचाऱ्यांनी विरोेध केला आहे.

मुंबई पालिकेतील बायोमेट्रीक हजेरीला विरोध, कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात सरकारी व खासगी कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी बंद केली होती. मात्र, आता मुंबई महापालिकेने आरोग्य कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. मात्र, याला कर्मचाऱ्यांनी विरोेध केला आहे.   पालिकेचा हा निर्णय कर्मचार्‍यांसाठी घातक आहे. त्यामुळे  बायोमेट्रिक हजेरी रद्द करण्यात यावी, अन्यथा सोमवारपासून बेमुदत आंदोलन पुकारण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

मुंबई महापालिका आरोग्य खात्यात काम करणारे अनेक कर्मचारी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, वाशी, पनवेल, नवी मुंबई, वसई, विरार येथून प्रवास करून कामावर येत आहेत. या प्रवासात सोशल डिस्टसिंग पाळणंही कठीण होत असताना हे कर्मचारी नियमित कामावर येऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आरोग्य खात्यातील कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे.

मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक असतानाही पालिका आयुक्तांनी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा घातक निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात आरोग्य खात्यातील कर्मचार्‍यांनी बुधवारी केईएम, नायर, सायन या पालिकेच्या अधिष्ठात्यांना निवेदन देऊन हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा सोमवारपासून बेमुदत आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. 


हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे ८०६ नवे रुग्ण, ६४ जणांचा दिवसभरात मृत्यू

violating lockdown in Maharashtra नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी १ लाख ५४ हजार जणांवर गुन्हे दाखल
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा