Advertisement

गिरगावच्या प्रभाग 220चा फैसला 5 एप्रिलला


गिरगावच्या प्रभाग 220चा फैसला 5 एप्रिलला
SHARES

गिरगाव - ईश्वरचिठ्ठी टाकून झालेला नशिबाचा निर्णय मान्य नसल्याचं सांगत शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर कोर्टात गेले होते. मात्र आता या याचिकेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायाधीश सुट्टीवर असल्याने या याचिकेवर 5 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. 

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 220 मध्ये शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर आणि भाजपाच्या अतुल शहांना 5946 इतकी समसमान मतं पडली होती. दोन्ही उमेदवारांना समान मतं पडल्यानं फेरमतमोजणी करण्यात आली. फेरमतमोजणीतही मतांमध्ये कोणताच फरक न पडल्यानं ईश्वर चिठ्ठीचा निर्णय घेण्यात आला. ईश्वर चिठ्ठीने लॉटरी पद्धतीनं भाजपाच्या अतुल शहांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र यावर आक्षेप नोंदवत सुरेंद्र बागलकर यांनी कोर्टात धाव घेतली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा