Advertisement

हा पूल धोक्याचा


हा पूल धोक्याचा
SHARES

चेंबूर - पूर्व मु्क्त मार्गावर स्थानिकांच्या रहदारीसाठी बांधलेला पूल अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे कमकुवत झाला आहे. त्यामुळे या पुलावरून जाणं धोक्याचं बनलंय.

एमएमआरडीएने पूर्व मुक्त मार्गावर नागाबाबानगर, राहुलनगर, अशोकनगर, कस्तुरबानगर, सह्याद्रीनगर येथील नागरिकांना रहदारीसाठी पूल बांधला आहे. या पुलावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. त्यासाठी संरक्षक अडथळेही लावण्यात आले आहेत. मात्र डिझर्वा बिल्डर यांनी हे संरक्षक अडथळे तोडले असून, येथून अवजड वाहनांची ये-जा सुरू केली आहे. त्यामुळे हा पूल कोसळून पूर्व मुक्त मार्गावर मोठा अपघात होण्याची भीती आहे. तरीही एमएमआरडीए प्रशासन, पोलीस कोणतीही दखल घेऊन कारवाई करत नाहीत, अशी स्थानिकांची तक्रार आहे.

संबंधित विषय
Advertisement