Advertisement

२ ते ५ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईसह राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, २ ते ५ ऑगस्टदरम्यान उत्तर महाराष्ट्राच्या किनारी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२ ते ५ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज
SHARES

मुंबईसह राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, २ ते ५ ऑगस्टदरम्यान उत्तर महाराष्ट्राच्या किनारी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाऱ्याचा वेग ताशी ६० किमीवरही पोहोचेल. गोवा आणि गुजरात किनारीही वेगानं वारे वाहणार असून, गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्याच्या समुद्रकिनारी ४ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच काळात महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधारा कोसळतील, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तविली आहे.

या काळात मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. २ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. ३ ऑगस्ट रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

४ ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ५ ऑगस्ट रोजी रायगड आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मुंबईत याच काळात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.हेही वाचा -

मराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं

शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा