Advertisement

मुंबईच्या मुसळधार पाऊस, मालाडमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू

मुंबई शहर उपनगर परिसरात बुधवार सकाळपासून पावसाची रिमझिम सुरु आहे.

मुंबईच्या मुसळधार पाऊस, मालाडमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू
SHARES

पावसाळ्यात झाड कोसळून मृत्यू होण्याची घटना समोर आली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास मुंबईतील मालाड पश्चिम येथील मामलेदार वाडी परिसरात झाड कोसळले. झाडाखाली चिरडल्यामुळे ३८ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कौशल महेंद्र दोषी असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मुंबई शहर उपनगर परिसरात बुधवार सकाळपासून पावसाची रिमझिम सुरु आहे. मुंबईतील काही भागात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरात मणिभाई मुंजी चाळ येथे सुमारे ३५ फूट उंच आणि चार फूट रुंदीचे एक पिंपळाचे झाड कोसळले. बुधवारी पहाटे कौशल दोषी चाळीतील शौचालयात गेला होता. यावेळी हे झाड कोसळले. झाडाचा वजनदार भाग डोक्यावर पडल्यामुळे कौशल यांचा जागीच मृत्यू झाला.

बुधवारी सकाळी गोरेगाव, विलेपार्ले, लोअर परळ आणि अंधेरीसह शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

आयएमडीने एका अलर्टमध्ये म्हटले आहे की, “पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.”

मुंबईमध्ये मंगळवारी दिवसभर पावसाची उपस्थिती होती. मात्र, सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३०पर्यंत मुसळधार पाऊस नोंदला गेला नाही. कुलाबा येथे ११ मिलीमीटर तर सांताक्रूझ येथे ३१.८ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत २३.४ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. डहाणू केंद्रावर २१.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८ ते सायं. ६ या कालावधीत शहरामध्ये ३.०६ मिलीमीटर तर पूर्व उपनगरांमध्ये २३.६० आणि पश्चिम उपनगरांमध्ये २२.११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.



हेही वाचा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा