Advertisement

येत्या दोन दिवसांत मुंबई अशीच भिजणार!


येत्या दोन दिवसांत मुंबई अशीच भिजणार!
SHARES

रविवारची सुट्टी फॅमिलीसोबत एन्जॉय करण्याच्या मुंबईकरांच्या प्लॅनवर पावसानं मुसळधार पाणी फेरलं! शिवाय सोमवारच्या आठवड्याची सुरुवातही मुंबईकरांसाठी तुफान पावसाने झाली. त्यामुळे नेहमीप्रमाणे वरुन कोसळणारा पाऊस आणि उशीराने येणाऱ्या ट्रेन या कचाट्यात मुंबईकर अडकला.

रविवारी सकाळी 8 ते सोमवारी सकाळी 8 यादरम्यान मुंबईतील विविध भागामध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस झालेल्या ठिकाणांमध्ये वरळी (63.75 मिमी), विक्रोळी (111.96 मिमी), भांडुप (90.63 मिमी) तर भायखळा (78.21 मिमी) या ठिकाणांचा समावेश आहे.

सोमवारी सकाळी 8 ते दुपारी 2 दरम्यान कुलाबा वेधशाळेने 35.8 मिमी तर सांताक्रुझ वेधसाळेने 28.6 मिमी पावसाची नोंद केली. दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Nothing quite like running in the rain. 5k. #marinedrive #mumbai #rainrun pic.twitter.com/vHm9jCfDAj

— Navin Rammohan (@Navin_Rammohan) August 27, 2017



हेही वाचा

पाऊस, भजी आणि बरंच काही!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा