पाऊस, भजी आणि बरंच काही!

पाऊस, भजी आणि बरंच काही!
पाऊस, भजी आणि बरंच काही!
पाऊस, भजी आणि बरंच काही!
पाऊस, भजी आणि बरंच काही!
See all
मुंबई  -  

मुसळधार पाऊस, गरमा-गरम चहा आणि खमंग आणि कुरकुरीत भजी... आहाहा... क्या बात है? भन्नाट कॉम्बिनेशन आहे ना? नक्कीच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल! भजी तशी आपली एनिटाईम फेव्हरिटच! पण पावसाळ्यात भजी खायची मजाच काही और असते! हाच विचार करुन दादरच्या अँटोनिया डिसिल्वा टेक्निकल स्कूलमध्ये एक दिवसीय भजी महोत्सव आयोजित केला होता.

भजी महोत्सव? आत्तापर्यंत कोकणी महोत्सव, कोळी महोत्सव ऐकलाय, पण हा कोणता महोत्सव? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. दादर सांस्कृतिक मंचातर्फे या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या भजी महोत्सवाची खासियत होती ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराच्या भज्या, गरमागरम चहा आणि सोबतीला आठवणीतील गाणी. गरम गरम तेलात भज्या सोडल्या जात होत्या. खुशखुशीत झाल्या की तेलातून बाहेर काढल्या जात होत्या. कुरकुरीत भज्यांचा नुसता घमघमाट सुटला होता. 

फक्त व्हेजच नाही तर नॉनव्हेज भज्यांचा आस्वादही यावेळी खवय्यांनी घेतला. व्हेज आणि नॉनव्हेज अशा ३൦ प्रकारच्या भज्यांची तिथे मेजवानी होती. गरम तेलात भज्या सोडण्यात येत होत्या.


मराठी  खाद्यसंस्कृतीमध्ये विविध प्रकारच्या भज्या केल्या जातात. पण त्याची माहिती सर्वांना असतेच असं नाही. त्यामुळे हा भजी महोत्सव आयोजित केला. भजी आणि भज्यांवरील आपलं प्रेम याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही. एकीकडे धो धो पाऊस पडतोय आणि दुसरीकडे गरमागरम भज्यांचा आस्वाद घ्यायची मजा काही औरच असते. त्यामुळे या चिंब पावसाळी वातावरणात भज्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. फक्त मुंबईतूनच नाही तर मिरज आणि सूरतहूनही काही मंजळी आली होती.

- उत्तरा मोने, आयोजक, दादर सांस्कृतिक मंच


व्हेजिटेरियन प्रकारातील भज्या

 • बटाटा भजी
 • कांदा भजी
 • वांगं भजी
 • सुरण भजी

 • कारल्याची भजी
 • फ्लॉवर भजी
 • मिरची भजी
 • पालक भजी

 • मूगडाळ भजी
 • चणाडाळ भजी
 • पनीर भजी
 • माठाच्या पानाची भजी

 • केळ्याची भजी
 • कॉर्न भजी

 • ओव्यांची भजी
 • भोपळ्याची भजी


नॉनव्हेजिटेरियन प्रकारातील भज्या


 • प्राँन्स भजी
 • खेकडा भजी
 • बोंबील भजी
 • चिकन खिमा भजी

 • मांदेली भजी
 • पापलेट भजी
 • सुरमई भजी

यासोबतच चिकन टिक्का, रेशमी कबाब यांचाही आस्वाद खवय्यांनी घेतला.

बापरे... एवढ्या प्रकारच्या भज्या? मग का नाही कुणी या महोत्सवाच्या प्रेमात पडणार? खवय्ये देखील अगदी चवीनं या भज्यांचा आस्वाद घेत होते. फक्त मुंबईच नाही तर बाहेरुन आलेल्या पाहुण्यांनीही या महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. भज्यांसोबतच गाण्यांची सुरेल मैफिलही रंगली होती.


भजी महोत्सव खूप छान होता. कांदा, बटाटा या भज्या तर घरा-घरात होतच असतात. पण कारल्याची भजी, केळ्याची भजी, कॉर्न भजी आणि नॉनव्हेजमध्ये खेकडा भजी अशा भज्यांचा आस्वाद घेतला. यासोबत गाण्यांची मैफिलही रंगली होती. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

 - देवकी खटाव

मौसम मस्ताना असताना भजी खाण्याचा मोह तुम्हालाही नक्कीच झाला असेल? हो की नाही? भजी महोत्सव पुन्हा होईल तेव्हा होईल...पण तोपर्यंत या चिंब आणि मस्त वातावरणात तुमच्या घरी सुद्धा होऊन जाऊ देत गरमा गरम भज्या आणि सोबतीला चहा!

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.