Advertisement

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस

मुंबईसह राज्यभरात हवामान खात्यने येत्या २४ तासात पावसाची शक्यता वर्तवली होती.

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस
SHARES

मुंबईत आज सकाळपासूनच पावसाला सुरूवात  झाली आहे. दक्षिण मुंबईत पावसाचा जोर कमी असला. तरी उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. मुलुंड, घाटकोपर, भांडुप, कुर्ला, अंधेरी, गोरेगाव, मालाड परिसरात पाऊस पहाटेपासूनच जोरदार कोसळतो आहे. तर दादर, हिंदमाता, किंग्ज सर्कल परिसरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने पाणी भरण्यास सुरूवात झाली आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी तैनात आहेत.

हेही वाचाः- पोलिसांना मिळणार हक्काचे घर

मुंबईसह राज्यभरात हवामान खात्यने येत्या २४ तासात पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार २८ जुलैच्या पहाटेपासूनच मुंबई, ठाणे, नवीमुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच कोरोनामुळे लाँकडाऊन असल्याने नारिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज दिवसभर मुंबईत पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.   

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा