धारावीकरांची सरकारकडे मदतीची मागणी

 Mumbai
धारावीकरांची सरकारकडे मदतीची मागणी
धारावीकरांची सरकारकडे मदतीची मागणी
धारावीकरांची सरकारकडे मदतीची मागणी
धारावीकरांची सरकारकडे मदतीची मागणी
See all

धारावी - धारावीतल्या प्रेमनगर झोपडपट्टी धारकांवर संघर्षमय जीवन जगण्याची वेळ आली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी या झोपडपट्टीत आग लागली होती. या भीषण आगीत शेकडो रहिवाश्यांची घरं, गोदामं जळून खाक झाली. अनेक संसार या भीषण आगीत उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे सरकारनं आम्हाला मदत करावी अशी मागणी पीडित करीत आहेत.

दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींनी तुटपुंजी मदत केली असली तरी थंडीच्या दिवसात उघड्यावर झोपण्याची वेळ इथल्या रहिवाशांवर आलीय. किरकोळ भाजलेले तसंच जखमी झालेल्या पीडित रहिवाशांवर अद्याप उपचार झाले नाहीत. खिशात पैसे नसल्यानं उपचारासाठी भीक मागावी लागत आहे.

Loading Comments