Advertisement

मुंबईकरांनो सावधान! हा पावसाळा मोठ्या भरतीचा!


मुंबईकरांनो सावधान! हा पावसाळा मोठ्या भरतीचा!
SHARES

एकीकडे कडक उन्हाळ्यामुळे मुंबईकर हैराण झाले असतानाच भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज बुधवारी व्यक्त केला आहे. पावसाच्या या अंदाजामुळे मुंबईकर सुखावले असले तरी त्याचबरोबर मुंबईत या पावसाळ्यात तब्बल 18 वेळा समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने जारी केला आहे.

मागील 3 आठवड्यांपासून अल निनोचा प्रभाव कमी झाल्यामुळे यावर्षी भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा नवा अंदाज भारतीय हवामान खात्याने बुधवारी व्यक्त केला आहे. या नव्या अंदाजामुळे कडक उन्हामुळे त्रासलेले मुंबईकर सुखावणार असले तरी येत्या पावसाळ्यात समुद्र किनाऱ्यावर लाटांची मजा घेताना त्यांना सावधही रहावे लागणार आहे. मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने जारी केलेल्या माहितीनुसार या पावसाळ्यात तब्बल 18 वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यातही रविवारी दिनांक 26 जून रोजी पावसाळ्यातील सर्वात मोठी 4.97 मीटर इतक्या उंचीच्या लाटांची भरती येणार आहे. जून महिन्यात 23 ते 28 या सलग 6 दिवसांच्या कालावधीत समुद्राला 4.50 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांची भरती येणार आहे. तर जुलै महिन्यात 22 ते 27 या 6 दिवसांच्या कालावधीत समुद्राला मोठी भरती असणार आहे. ऑगस्ट महिन्यात 21 ते 24 हे चार दिवस मोठ्या भरतीचे असतील तर सष्टेंबर महिन्यात 19 आणि 20 तारखेला समुद्राला मोठी भरती असणार असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.


वार
तारीख
वेळ
लाटांची उंची (मीटरमध्ये)
शुक्रवार
23 जून 2017
सकाळी 11.34
4.71
शनिवार
24 जून 2017
दुपारी 12.20
4.89
रविवार
25 जून 2017
दुपारी 1 वाजून 7 मिनिटं
4.97
सोमवार
26 जून 2017
दुपारी 1 वाजून 54 मिनिटं
4.94
मंगळवार
27 जून 2017
दुपारी 2 वाजून 39 मिनिटं
4.81
बुधवार
28  जून 2017
दुपारी 3 वाजून 23 मिनिटं
4.60


वारतारीखवेळलाटांची उंची (मीटरमध्ये)
शनिवार22 जूलै 2017सकाळी 11.204.62
रविवार23 जूलै 2017
दुपारी 12.064.81
सोमवार24 जूलै 2017
दुपारी 12.504.89
मंगळवार25 जूलै 2017
दुपारी 1.324.87
बुधवार26 जूलै 2017
दुपारी 2.124.75
गुरुवार27 जूलै 2017
दुपारी 2.544.54


वारतारीख वेळ लाटांची उंची (मीटरमध्ये)
सोमवार21 ऑगस्ट 2017सकाळी 11.494.68
मंगळवार22 ऑगस्ट 2017
दुपारी 12.284.75
बुधवार23 ऑगस्ट 2017
दुपारी 1.054.71
गुरुवार24 ऑगस्ट 2017
दुपारी 1.414.58


वारतारीखवेळलाटांची उंची (मीटरमध्ये)
मंगळवार19 सप्टेंबर 2017सकाळी 11.254.50
बुधवार20 सप्टेंबर 207दुपारी 12.034.54
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा