Advertisement

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण
SHARES

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उदय सामंत यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता सामंत याचाही अहवाल पॉसिटीव्ह आला आहे.

'मागील १० दिवस स्वतः विलगिकरणात आहे. नुकतीच कोविड टेस्ट करून घेतली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेले १० दिवसांत कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळं इतरांना संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होईन', अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही तापले होते. या संपूर्ण काळात उदय सामंत हे सातत्यानं राज्यभरात फिरत होते. त्यातून त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. आतापर्यंत राज्य सरकारमधील डझनभराहून अधिक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, सुनील केदार, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे या मंत्र्यांचा समावेश आहे. या सर्वांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा