हायवेपासून दूर असलेल्या बारला अच्छे दिन!

  Mumbai
  हायवेपासून दूर असलेल्या बारला अच्छे दिन!
  मुंबई  -  

  मुंबई - वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे लगत असणारे बार बंद झाल्यानंतर उपनगरातील बारला अच्छे दिन आले आहेत. गोरेगाव लिंकरोड परिसरातील बारमध्ये तर हायवेलगत असलेले बार बंद झाल्याने एकच गर्दी होत असल्याचे एका बार मॅनेजरने सांगितले आहे. विशेष म्हणजे उपनगरात संध्याकाळ झाली की बारच्या बाहेर रांगाच रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

  नोटबंदीनंतर या बारवर संकटाचं सावट आलं होतं. मात्र आता कोर्टाच्या निर्णयाचा फायदा झाला आणि त्यांच्यावरील मंदीचं सावट उठलं. महत्त्वाचं म्हणजे या बारना तेजी आली असताना हुक्का पार्लर वाल्यांना देखील फायदा होत असल्याचं बार मालक राजू अन्ना याने सांगितले. आधी हायवेला लागून असलेल्या बारमुळे आतमध्ये असलेल्या बारकडे कुणी फिरकत नसे. मात्र आता अचानक हायवेलगतचे बार बंद झाले आणि हे बार फुल झाले त्यामुळे आता बारमध्ये एक्स्ट्रा सोफे देखील लावण्याची वेळ बार मालकांवर आली आहे. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.