Advertisement

परळच्या हिंदमाता पुलावर अपघात; ३ जण जखमी


परळच्या हिंदमाता पुलावर अपघात; ३ जण जखमी
SHARES

मुंबईतील परळच्या हिंदमाता पुलावर मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. टेम्पो आणि कारची एकमेकांना धडक दिल्यामुळं मोठ्या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तर, या अपघातात ३ जण जखमी झाले आहेत.


हिंदमाता पुलावर कार व टेम्पोने एकमेकांना धडक दिल्यामुळं कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातामुळं पुलावर दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 


घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून परिस्थीती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पुलावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून अपघातग्रस्त गाड्या हटवण्यात आल्या आहेत. 


वाहतूक कोंडी हटवण्यासाठी वाहतूक पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तर, जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा