Advertisement

लोकांच्या गर्दीमुळे पेंग्विन तणावात ?


लोकांच्या गर्दीमुळे पेंग्विन तणावात ?
SHARES

राणीचा बाग - महापालिकेने 25 जुलै 2016 ला दक्षिण कोरियाच्या सेऊलमधील आठ हम्बोल्ट पेंग्विन आणले होते. या पेंग्विनच्या खरेदीसाठी पालिकेने सुमारे 3 कोटी रुपये मोजले होते. याशिवाय त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले 1700 चौरस फुटांचे शीतघर, 250 चौरस फुटांचे विशेष संरक्षित क्षेत्र, तापमान नियंत्रण, तलाव तसंच पेंग्विनची पाच वर्षे देखभाल आणि निगा या सगळ्यांसाठी तब्बल 45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, सुरूवातीपासूनच मुंबईतील वातावरण पेंग्विन्ससाठी अनुकूल नसल्याने या प्रस्तावाला विरोध करण्यात आला होता. मात्र, तरी देखील सत्ताधारी शिवसेनेने हट्टाला पेटून राणीच्या बागेत पेंग्विन आणले आणि आता त्यांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं. दररोज पेंग्विन पाहण्याकरता दहा ते पंधरा हजार माणसे गर्दी करत आहे. पेंग्विन हा मानसिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील पक्षी असून आपल्या अवतीभोवती सतत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहून त्यांना तणाव जाणवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.



सर्वात आधी तर पेंग्विन हा मुळे येथील पक्षी नाही आहे. त्याला त्याच्या मायदेशी परत पाठवायला हवं असं प्लांट अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी सुनीश कुंजू यांनी सांगितलं.


लोकांच्या गर्दीमुळे पेंग्विनला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यांना ठेवण्यात आलेल्या कक्षाची काच ही साउंडप्रूफ आहे. त्यामुळे त्यांना तणाव किंवा इतर कोणतीही अडचण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचं वीर जिजामाता प्राणी संग्रहालयाचे अधीक्षक संजय त्रिपाठी यांनी सांगितलं.

आम्हाला पेंग्विन तणावात आहे, असं वाटत नाही. एक परदेशी प्राणी आपल्याला आपल्या देशात पाहायला मिळत आहे, याचा आनंद वाटत असल्याचं मनोज पाटील यांनी सांगितलं.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा