Advertisement

मुंबईच्या किनारपट्ट्यांवर डाॅल्फिन!


मुंबईच्या किनारपट्ट्यांवर डाॅल्फिन!
SHARES

आकर्षक असे डाॅल्फिन आणि त्यांच्या समुद्रातील लीला पाहायच्या म्हटलं की, मुंबईकरांना धाव घ्यावी लागते ती मालवण, तारकर्ली, देवबाग आणि रत्नागिरीला. प्रत्यक्षात समुद्रात डाॅल्फिनला पाहण्याचा आनंद काही औरच असतो. मुंबईला मोठा समुद्र लाभलेला असतानाही मुंबईच्या समुद्रातील पाणी गोडं आणि खारं नसल्यानं इथं डाॅल्फिन आढळत नाहीत. पण गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईच्या हाजी अली, ससून डाॅक, वांद्रे-वरळी सी लिंक परिसरात डाॅल्फिन आढळत असल्याचं मच्छिमारांकडून सांगितलं जात आहे. तर मच्छिमार नेते दामोदर तांडेल यांनीही 'मुंबई लाइव्ह' शी बोलताना याला दुजोरा दिला आहे. 


मच्छिमारांना डाॅल्फिनचं दर्शन

मुंबईच्या किनारपट्टीवर गेल्या काही महिन्यांत मोठाले मासे मृतअवस्थेत आढळले आहेत. त्यामुळे मुंबईचा समुद्र प्रदुषित झाल्याची चर्चा असताना याच समुद्रात गेल्या काही दिवसांपासून मच्छिमारांना डाॅल्फिनचं दर्शन होत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. तीन दिवसांपूर्वी आपल्याला हाजी अली परिसरात मच्छिमारीसाठी गेलो असता डाॅल्फिन दिल्याची माहिती वरळी कोळीवाडा येथील मच्छिमार मार्शल कोळी यांनी मुंबई  लाइव्हला दिली आहे. तर अन्यही मच्छिमारांना मुंबईच्या वेगवेगळ्या किनारपट्टी भागात गेल्या काही दिवसांपासून डाॅल्फिनचं दर्शन होत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


हॅम्पबॅक प्रजातीचे डाॅल्फिन

मुंबईच्या किनारपट्टीवर दिसत असलेले डाॅल्फिन हे हॅम्पबॅक प्रजातीचे असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान गेल्या वर्षीही हिवाळ्यात डाॅल्फिन दिसल्याचा दावा मच्छिमारांनी केला होता. तर आता हिवाळ्यात पुन्हा डाॅल्फिन दिसू लागल्याचं मच्छिमारांचं म्हणणं आहे. दरम्यान हिवाळ्यात समुद्रातील गाळ किनार्यांवरून वाहून जात असल्यानं डाॅल्फिन मुंबईच्या समुद्रात दिसत असल्याचंही मच्छिमारांचं म्हणणं आहे. मुंबईच्या किनारपट्ट्यांवर डाॅल्फिन दिसणं ही मुंबईकरांसाठी आनंदाची बाब असून डाॅल्फिन बघण्यासाठी उद्यापासून मुंबईकरांनी मुंबईच्या किनारपट्ट्यांवर गर्दी केली तर आश्चर्य वाटायला नको.



हेही वाचा -

शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी फेब्रुवारीचा मुहुर्त ?

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांची नियुक्ती वादात?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा