Advertisement

सोनू निगमचा खटला मी लढेन - मोहम्मद अली उर्फ बाबूभाई


सोनू निगमचा खटला मी लढेन - मोहम्मद अली उर्फ बाबूभाई
SHARES

मोहम्मद अली उर्फ बाबूभाई खान. राहणार- बेहरामपाडा, वांद्रे, मुंबई. वय- 66 वर्ष. हा तपशील आहे एका अशा ‘असामी’चा ज्यानं खरा इस्लाम जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतला आहे. "मशिदीवरचे भोंगे उतरवा. या भोंग्यांचा माझ्या इस्लामशी संबंध नाही," ही भूमिका गेली तब्बल 24 वर्ष मोहम्मद अली उर्फ बाबूभाई हिरीरीने मांडत आले आहेत. 

यासाठी न्यायालयीन लढाही लढले. पार्श्वगायक सोनू निगमने 'मशिदीवरचे भोंगे काढा', हे सुचवणारं ट्विट केलं आणि त्यानिमित्तानं हा विषय गेली सुमारे अडीच दशकं लाऊन धरणारे बाबूभाई पुन्हा चर्चेत आले. ध्येयाला वाहून घेतलेल्या या अवलियाला 'मुंबई लाइव्ह' ने गाठलं आणि बोलतं केलं. बाबूभाई 'मुंबई लाइव्ह'शी भरभरुन बोलले. "आपल्याला सोनू निगमचं कौतुक वाटतं. वेळ पडल्यास आपण सोनू निगमसाठी कायदेशीर लढाई लढू, असं त्यांनी मुलाखतीत ठासून सांगितलं." सततच्या पाठपुराव्यामुळे तब्बल 12 मशिदींवरचे भोंगे कोणतीही कटुता न आणता उतरण्यात यशस्वी ठरलेल्या मोहम्मद अली उर्फ बाबूभाई खान यांची विशेष मुलाखत वाचायलाच हवी. मूळ हिंदी भाषेत असलेली ही मुलाखत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

- सोनू निगम का केस मैं लडूंगा- मोहम्मद अली उर्फ बाबूभाई

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा