भटक्या गुरांसाठी आयआयटी मुंबईत गोसंवर्धन?

मागील वर्षी एका विद्यार्थ्याला एका वळूने जोरदार धडक दिल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी आयआयटी परिसरात वाढलेल्या जनावरांच्या वावराबाबत प्रशासनाने संकुलातील गायींची काहीतरी व्यवस्था करावी अशी तक्रार केली होती

SHARE

मुंबईत अनेकदा मोकाट रस्त्यावर फिरताना, तर कधी कचऱ्याच्या ढिकाऱ्यात अनेक जनावर आढळून येतात. अशा मोकाट जनावरांनी अनेकदा रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशाला धडक दिल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. मागील वर्षीच पवईत एका विद्यार्थ्याला एका वळूनं धडक दिल्यानं तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर आयआयटीच्या प्रशासनानं भटक्या गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी संकुलात आता चक्क गोठाच बांधण्याची शिफारस केली आहे. त्यामुळंच मुंबईत भटक्या गुरांसाठी मुंबईत गोठा बांधायचा का? याबाबत स्थापन केलेली विशेष समिती विचार करत आहे.

विद्यार्थी गंभीर जखमी

मुंबईच्या आयआयटी संकुलात मोकाट बैल आणि गायींचा वावर वाढला आहे. मागील वर्षी एका विद्यार्थ्याला एका वळूनं जोरदार धडक दिल्यानं विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी आयआयटी परिसरात वाढलेल्या जनावरांच्या वावराबाबत प्रशासनानं संकुलातील गायींची काहीतरी व्यवस्था करावी अशी तक्रार केली होती. त्यावेळी विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता प्रा. तपनेंदू कुंडू यांच्या अध्यक्षतेखाली प्राध्यापकांची एक समिती स्थापन केली.

मोकळा परिसर राखीव

या समितीनं अनेक बैठका घेतल्या. संस्थेतील गायी बाहेर जाऊ नये असं बहुतांश रहिवाशांना वाटत असल्याचं मत या बैठकांमध्ये मांडण्यात आलं. त्यामुळं अखेर गायी संकुलातच सांभाळण्याची तयारी समितीनं दर्शविली आहे. यासाठी ८ क्रमांकाच्या वसतिगृहामागील मोकळा परिसर राखीव ठेवण्याची सूचना समितीनं केली आहे.

जीपीएस ट्रॅकर

या गायींची व्यवस्थित काळजी घेण्याच्या उद्देशानं गायींवर लक्ष ठेवण्यासाठी जीपीएस ट्रॅकर त्यांच्यावर बसविण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांचा शोध घेणं ही सोपं जाणार आहे. या गायींची देखभाल करण्यासाठी काहीजणांची नेमणूक ही करण्यात येणार आहे. तर गायींच्या गायींना त्यांची हक्काची जागा मिळावी यासाठी गोठा उभारण्याची सूचनाही करण्यात आली आहे. याबाबतची माहिती आयआयटी विद्यार्थ्यांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ‘इनसाइट’ या वेबसाइटवर देण्यात आली आहे.हेही वाचा -

ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते- संजय राऊत

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडं मागणीसंबंधित विषय
ताज्या बातम्या