Advertisement

'मुंबई लाइव्ह'च्या दणक्यानंतर 'राजश्री शाहू विद्यालया'च्या जागेवरील पार्किंग हटले


'मुंबई लाइव्ह'च्या दणक्यानंतर 'राजश्री शाहू विद्यालया'च्या जागेवरील पार्किंग हटले
SHARES

लेबर कॅम्प येथे असलेल्या राजश्री शाहू विद्यालयाच्या जागेवर अवैध पार्किंग होत असल्याची बातमी 'मुंबई लाइव्ह'नं 9 एप्रिल रोजी दाखवली होती. या बातमीची दखल घेत जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी सदर शाळेच्या रिकाम्या जागेवर होत असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी मैदानाला गेट लाऊन घेतले आहे. लवकरच या शाळेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चार वर्षांपूर्वी माटुंगा लेबर कॅम्पमध्ये असलेली 'राजर्शी शाहू विद्यालय', ही खूप जुनी शाळा होती. हिंदी, मराठी, उर्दू साऊथच्याही काही भाषा या शाळेत शिकवल्या जायच्या. विभागातील सामान्य गरीब विद्यार्थ्यांसाठी एक चांगली शिक्षणाची सोय होती. परंतु चार वर्षांपूर्वी पालिकेकडून धोकादायक इमारत आणि नूतनीकरणाच्या नावाखाली शाळेची इमारत पाडण्यात आली. पण आजतागायत या ठिकाणी ना पालिकेचे लक्ष आहे ना शिक्षण विभागाचे. शाळेच्या जागी मोकळे मैदान असून, आजही विभागातील विदयार्थी पालकांना प्रतिक्षा आहे ती शाळेच्या नवीन इमारतीची. कारण या विभागात पालिकेची एकमेव मोठी आणि अनेक भाषिक शाळा असल्याने हजारो विदयार्थी या शाळेत शिकत होते. या सर्व विद्यार्थ्यांसमोर मोठे प्रश्न चिन्ह होते ते आम्ही पर्यायी शिक्षण कुठे घ्यायचे?

सध्या या मुलांसाठी सहा खोल्यांची खुरडी वजा शाळा सुरू केली आहे. पण तिथे विभागातील सर्व मुलांना शिक्षण घेणं शक्य होत नसल्याने इतर विभागांकडे शिक्षणासाठी धाव घ्यावी लागत आहे. चार वर्ष पूर्ण झाली तरी शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणाचा नारळ फुटत नाही. शिवाय शाळा पाडून चार वर्ष झाल्यामुळे अतिक्रमण झाले आहे. शिवाय रात्रीच्या वेळी दारूड्यांचे फावते त्यामुळे ठिकाणी राहणाऱ्या लोकांना त्रासाला समोरं जावं लागत आहे . त्यामुळे लवकरात लवकर शाळांची नवी इमारती उभी करावी अशी मागणी आता स्थानिक रहिवासी करू लागले आहेत. या विषयावर जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्टकडे आमच्या विभागाने प्रस्ताव पाठवला आणि लवकरच शाळेची नवीन इमारत बनणार असल्याची माहिती दिली.


हेही वाचा - 

चार वर्षांत राजर्षी शाहू विद्यालय झालं गायब!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा