Advertisement

मुंबईसह 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

शुक्रवारी कोकणात मुसळधार पाऊस होणार असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
SHARES

राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली. गुरुवारी अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. अरबी समुद्रातून मोसमी पावसाला पोषक वातावरण तयार झालं असून कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं कोकण आणि विदर्भात दमदार पाऊस झाला. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यभर पाऊस सक्रिय होणार असून शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

शुक्रवारी कोकणात मुसळधार पाऊस होणार असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्याप्रमाणेच सकाळपासूनच मुंबई, ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातही काही ठिकाणी पाऊस सुरु झालाय.

पूर्वानुमानानुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यातही कोकण विभागात फारसा पाऊस नाही. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडू शकतो. त्यानंतर ८ जुलैला विदर्भामध्ये तसेच लगतच्या मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मात्र, याचे प्रमाण ९ ते १५ जुलैच्या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात सर्वदूर पाऊस असू शकेल. तसेच कोकणातही पुन्हा पावसाचा वेग वाढेल असा, अंदाज आहे.



हेही वाचा -

पुरेशा लस साठ्याअभावी शुक्रवारी अनेक ठिकाणी लसीकरण बंद

वन मुंबई मेट्रो कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा