Advertisement

मुंबईत लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ८० ते ८५ टक्के

मुंबईत दररोज सापडणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे नसल्याची धक्कादायक माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.

मुंबईत लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ८० ते ८५ टक्के
(File Image)
SHARES

महाराष्ट्राच्या (maharashtra) इतर जिल्ह्यांसोबत मुंबईतही दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मुंबईत दररोज सापडणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे नसल्याची धक्कादायक माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.

मागच्या काही आठवड्यातील आकडेवारीचं विश्लेषण केल्यानंतर ही बाब पुढं आली आहे. बुधवारी मुंबईत ११०० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यापैकी ८३ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची (coronavirus) कुठलीही लक्षणे नव्हती, असं चहल यांनी सांगितलं. 

बुधवारी मुंबईत ११६७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे मागील २ दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत होती. मुंबईत मंगळवारी ६४३ नवीन रुग्ण आढळले होते. मात्र बुधवारी अचानक ही संख्या दुप्पटीने वाढली. 

मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ३ लाख २१ हजार ६९८ इतकी झाली आहे. बुधवारी ३७६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख १ हजार ५७ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या ८३२० अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. 

हेही वाचा- कोरोनाचा नवा स्ट्रेन मुंबईत नाही – सुरेश काकाणी

बुधवारी ४ रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत कोरोना (covid19) बळींची संख्या ११४५३ झाली आहे. मुंबईत १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारीदरम्यान कोरोनावाढीचा दर ०.२४ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २९४ दिवसांवर आला आहे. 

वांद्रे पश्चिम, चेंबूर, मुलुंड, घाटकोपर, वडाळा, अंधेरी पश्चिम, कुर्ला, ग्रॅन्ट रोड या भागात कोरोना रुग्णवाढ अधिक असल्याचं आढळून आलं आहे. या भागात आता रोज प्रत्येकी ४० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. तर अंधेरी पश्चिाम भागात ही संख्या ७० पर्यंत पोहोचली आहे.

राज्यातील ७८ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत, तर मुंबईत ४९ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करुन घेऊ नका, असे निर्देश महालिका (bmc) आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना निर्देश दिले आहेत.  

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने वेगवेगळी पावले उचलली आहेत. बाहेर फिरताना मास्क न वापरऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही, तर लॉकडाऊनचा इशाराही सरकारमधील मंत्र्यांनी दिला आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा