Advertisement

‘बेस्टचा अर्थसंकल्प महापालिका अर्थसंकल्पात अंतर्भूत करा’


‘बेस्टचा अर्थसंकल्प महापालिका अर्थसंकल्पात अंतर्भूत करा’
SHARES

मुंबई - बेस्ट उपक्रम हा महापालिकेचा अंगीकृत उपक्रम आहे. बेस्ट उपक्रम हा सध्या तोट्यात असून, बेस्टचा अर्थसंकल्प स्वतंत्र न मांडता तो महापालिकेच्या अर्थसंकल्पात अंतर्भूत करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
बृहन्मुंबई विद्युत व परिवहन विभागाचा अर्थसंकल्प स्वतंत्र मांडला जातो. मात्र, बेस्टच्या या अर्थसंकल्पाला महापालिकेच्या स्थायी आणि महापालिका सभागृहाची मंजुरी आवश्यक आहे. २०१७-१८ चा सुमारे ५५० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीने मंजूर करून स्थायी समितीच्या मान्यतेला पाठवला होता. मात्र, इथे हा अर्थसंकल्प दप्तरी दाखल करण्यात आल्यानंतर महापालिका सभागृहानेही तुटीचा अर्थसंकल्प असल्यामुळे तो फेटाळला होता. परंतु सध्या बेस्ट उपक्रम तोट्यात असून, सुमारे ४४ हजार कर्मचाऱ्यांचे पगार अद्यापही झालेले नाहीत. पगारासाठी बेस्ट उपक्रम वारंवार बँकांकडून उचल घेत असते. मुंबई महापालिकाही बेस्टला आर्थिक मदत करत असते. परंतु तोट्यात जाणाऱ्या बेस्टची आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पाऊल उचलण्याची वेळ आली आहे.
केंद्र सरकारच्या मुख्य अर्थसंकल्पात रेल्वेचा अर्थसंकल्प अंतर्भूत करून एकत्रपणे मांडण्यात आला होता. त्याच धर्तीवर महापालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प अंतर्भूत करून मांडण्यात यावा, अशी मागणी मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी केली आहे. महापालिकेचा २०१७-१८ चा अर्थसंकल्प काही दिवसात मांडला जाणार आहे. या अर्थसंकपात बेस्टचाही अर्थसंकल्प समाविष्ठ करून मांडला जावा, अशी सूचना स्थायी समितीने केली होती. याचे स्मरण प्रशासनाला करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. बेस्टचा अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पात केल्यास महापालिकेचा निधी उपक्रमाकडे वळवणे सोपे जाईल. आणि बेस्टला तोट्यातून बाहेर काढणेही सोपे जाईल, असे फणसे यांनी स्पष्ट केले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा