Advertisement

धारावीत देशातील पहिले प्लाझ्मा दान शिबीर

धारावीतील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. यासाठी धारावीत प्लाझ्मा दान शिबीर आयोजीत करण्यात येणार आहे.

धारावीत देशातील पहिले प्लाझ्मा दान शिबीर
SHARES

मुंबईत कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेली धारावी आता प्लाझ्मा दानासाठी पुढे सरसावली आहे. धारावीतील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. यासाठी धारावीत प्लाझ्मा दान शिबीर आयोजीत करण्यात येणार आहे. या शिबीरात पालिकेकडून तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत जे रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या सक्षम ठरतील अशाकडून प्लाझ्मा घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली.

धारावीतील बरे झालेल्या काही रुग्णांची पुढच्या पाच दिवसात तपासणी करण्यात येणार आहे. त्यातील प्लाझ्मा दान करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम अशांकडून शिबीरात प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. त्यासाठी हे शिबीर देशात एक वेगळा उपक्रम ठरेल असा विश्वास आयुक्त चहल यांनी व्यक्त केला. २७ जुलै रोजी हे शिबीर होणार आहे.

 धारावीत आतापर्यंत २०९५ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या काही रुग्णांची पालिकेकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच दिवसांचे विशेष आरोग्य शिबीर आयोजित केले जाणार आहे. या शिबीरात प्लाझ्मा दानासाठी सक्षम रुग्ण निवडण्यात येणार असून त्यांना प्लाझ्मा दानासाठी तयार करण्यात येणार आहे. त्यातून जे प्लाझ्मा उपलब्ध होतील त्यातून पालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी वावरण्यात येणार आहेत.

प्लाझ्मा थेरपीने रुग्णाच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचे समोर आले. पालिकेच्या काही रुग्णालयांत प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्यानंतर गंभीर रुग्णांवर या थेरपीचा वापर करण्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे येण्याचे आवाहन पालिकेसह राज्य सरकारने केलं. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेऊन प्लाझ्मा उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.



हेही वाचा - 

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ३०३ रुग्ण

मुंबई महापालिकेला दुसरा धक्का, आरोग्य समितीच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा