Advertisement

PUBG गेमवर बंदी? जाणून घ्या PUBGचा चायनाशी संबंध

PUBG गेमवर बंदी घालण्याची नेमकं कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासोबतच पब्जी कोणी बनवला ? आणि या गेमचा चायनाशी नाव का जोडलं जातंय ते जाणून घ्या...

PUBG गेमवर बंदी? जाणून घ्या PUBGचा चायनाशी संबंध
SHARES

केंद्र सरकारनं नुकतीच ५९ चायनीज APP बंद केले. आता आणखी काही APP बंद करण्याच्या विचारात सरकार आहे. या APP मध्ये तरुणाईचं आवडता गेम PUBG चा देखील समावेश आहे. PUBG या गेमसाठी तरूणाईंच्या क्रेझ बद्दल काही वेगळं सांगण्याची आवश्यक्ता नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच या पबजीच्या प्रेमात पडले. पण आता सुरक्षेच्या कारणास्तव या गेमवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पण या गेमवर बंदी घालण्याची नेमकं कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासोबतच पब्जी कोणी बनवला ? आणि या गेमचा चायनाशी नाव का जोडलं जातंय ते जाणून घ्या... 

कुणाची संकल्पना?

Player unknown battle ground हा पब्जीचा फुलफॉर्म आहे. हे नाव खुप विचारपूर्वक ठेवलं आहे. कारण युध्दभूमीवर अनोळखी असलेले खेळाडू एकमेकांना मारण्यासाठी उतरतात. ही संकल्पना आहे ‘ब्रँडन ग्रीन’ नावाच्या आयर्लंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणाची. ब्रँडन ग्रीन सुरुवातीपासून शूटिंग आणि मारामारीच्या गेम्सचा फॅन होता. सुरुवातीला आर्मा नावाचा गेम खेळत असणारा ब्रँडन नंतर आर्मा 3 या गेमवर काम करू लागला. हा पण पब्जी सारखाच battleground वर खेळला जाणारा गेम आहे.

ब्रँडन ग्रीनला दक्षिण कोरियाची गेमिंग कंपनी ब्लुहोलनं कामासाठी बोलावलं. या कंपनीला जेव्हा ब्रँडनच्या आर्माबद्दल माहिती झाली तेव्हा त्यांनी ब्रँडनला बोलावून घेतलं आणि अश्याप्रकारे पब्जी बनण्याची सुरुवात झाली.

हेही वाचा : 'या' वेबसाईट्स वर 'असा' पहा १० वीचा निकाल

गेम चायनीज की कोरियन?

पण सध्या या गेमवर बंदी घाला, अशी मागणी जोर धरतेय. कारण हा गेम चायनानं लाँच केल्याचं म्हटलं जातंय. पण PUBG मोबाईल कोरियन असल्याची चर्चा आहे. कारण PUBG मोबाईल बनवणारी कंपनी ब्ल्यूहोल आहे, ती चीनची नसून दक्षिण कोरियाची आहे. प्लेअर अननोन बॅटलग्राऊंड म्हणजेच PUBG मल्टी प्लेअर गेमिंगला ब्ल्यूहोल कंपनीनं बनवला आहे. ही कंपनी दक्षिण कोरियन ब्ल्यूहोल स्टुडिओची सहाय्यक कंपनी आहे.


चीनशी संबंध कसा?

PUBG व्हिडीओ गेम अधिकाधिक लोकप्रिय झाला आणि यामुळे, चीनमधील सर्वात मोठी व्हिडीओ गेम प्रकाशक, टेंसेंट गेम्स कंपनीनं हा गेम चीनमध्ये लाँच करण्यासाठी आणि कंपनीमध्ये भागीदारी खरेदी करण्यासाठी दक्षिण कोरियन ब्ल्यूहोलशी चर्चा केली. चीनी कंपनी टेंसेंट गेम्सनं ब्ल्यूहोलमध्ये स्टेक खरेदी केला.


... म्हणून चायना कंपनीचा लोगो दिसतो 

दरम्यान, PUBG मोबाईल आवृत्ती टेंसेंटनं विकसित केली होती. यानंतर, टेंसेंट PUBG मोबाइल गेमचा प्रकाशक झाला. तेव्हापासून, PUBG मोबाइल उघडल्यावर टेंसेंटचा लोगो दिसतो, जी चीनी कंपनी आहे. PUBG आणि PUBG मोबाईलमध्ये फरक आहे. या दोघांच्या प्रकाशकांमध्ये फरक आहे. चीनमध्ये ब्लूहोलनं टेंसेंटसमवेत PUBG मोबाईल बाजारात आणला.

सुरुवातीला, टेंसेंटनं PUBG चीनमध्ये लाँच करण्यासाठी अधिकार मिळवले. यानंतर, या खेळाची मोबाइल आवृत्ती आणण्यासाठी कंपनीनं ब्ल्यूहोलबरोबर भागीदारी केली. एकंदरीत, PUBG मोबाईल हा गेम टेंसेंटनं तयार केला आणि चीनमध्ये लाँच केला.

या चित्रपटापासून प्रेरित

PUBG हा गेम एका ‘बॅटल रॉयल’ नावाच्या जपानी चित्रपटापासून प्रेरित आहे. पब्जीचे पीसी वर्जन २३ मार्च २०१७ ला बाजारात आले. पण या गेमनं एका वर्षात सगळे रेकॉर्ड तोडले. हा गेम खरतर तेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला जेव्हा फेब्रुवारी २०१८ ला याचे मोबाईल वर्जन सुरू करण्यात आले. मोबाईल वर्जन बाजारात आल्याच्या काही महिन्यानंतर हा गेम प्ले स्टोरवर नंबर वन वर पोहोचला.



हेही वाचा

अवाजवी बिल आकारलं, मिरा रोडमधील 'ह्या' हॉस्पिटलची कोव्हिड मान्यता रद्द

महाराष्ट्र बोर्डाचा १० वीचा निकाल उद्या होणार जाहीर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा