
दिल्ली, मुंबई (mumbai), बेंगळुरू आणि इतर विमानतळांवरून 300 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे (flights) रद्द करण्यात आली.
कंपनीने म्हटले आहे की मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे विमानतळावरील कामकाज विस्कळीत होत आहे. तसेच विविध शहरांमधील हजारो इंडिगो प्रवाशांना (passangers) सलग तिसऱ्या दिवशी त्रास सहन करावा लागला.
उड्डाणे रद्द करण्याबरोबरच विविध विमानतळांवरही विलंब झाला. इंडिगोची (indigo) विमानसेवा वक्तशीरपणामुळे प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे.
तथापि, गेल्या तीन दिवसांपासून, अपुरे मनुष्यबळ आणि वेळापत्रकात बदल केल्यामुळे मुख्यतः उड्डाणे विस्कळीत झाली आहे.
गुरुवार दुपारपर्यंत इंडिगोच्या 300 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. दिल्ली विमानतळावर सर्वाधिक 95 उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यानंतर मुंबई विमानतळावर 85 उड्डाणे रद्द करण्यात आली.
हैदराबाद विमानतळावर 70 आणि बेंगळुरू विमानतळावर 50 उड्डाणे रद्द करण्यात आली. त्याव्यतिरिक्त, इतर विमानतळांवरही उड्डाणे रद्द करण्यात आली. ज्यामुळे सर्वत्र प्रवाशांची गर्दी, गोंधळ आणि त्रासदायक दृश्ये निर्माण झाली.
इंडिगोचे कामकाज सुरळीत करण्यासाठी आणि वेळापत्रक पूर्ववत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पीटर एल्बर्स यांनी गुरुवारी सांगितले.
बुधवारी, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या सहा प्रमुख विमानतळांवरील डेटाच्या आधारे इंडिगोची कामगिरी 19.7 टक्क्यांपर्यंत घसरल्याचे वृत्त आले.
मंगळवारी हा आकडा चक्क 35 टक्के होता. या सर्वांचा परिणाम म्हणून, गुरुवारी मुंबई शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांनी घसरले.
हेही वाचा
