जंतूसंसर्गामुळे पेंग्विन दगावला

  Pali Hill
  जंतूसंसर्गामुळे पेंग्विन दगावला
  मुंबई  -  

  मुंबई - राणीबागेतल्या पेंग्विनचा मृत्यू जंतूसंसर्गामुळे झाल्याचं सिद्ध झालंय. यासंदर्भातील अहवाल परळच्या पशुवैदयकिय महाविद्यालयाच्या पॅथोलॉजीकल विभागातील प्राध्यापकांनी दिलाय. 18 ऑक्टोबरला एका पेंग्विनला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. पशुवैदयकिय अधिकाऱ्यांनी आणि कल्चर सेन्सिटिव्हीट चाचणी केली होती. त्यानुसार या पेंग्विनला एनोफलाक्सेसिन या जिवाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना रविवारी हा पेंग्विन दगावला.

  एक गेला दुसरा आला

  मृत पेंग्विनच्या बदल्यात आणखी एक नवा पेंग्विन मागवण्यात येणाराय. करारानुसार पेंग्विन दगावल्यास त्याची भरपाई देण्याचा करार पालिकेनं केलाय. त्याप्रमाणे पालिकेनं दगावलेल्या पेंग्विनच्या मोबदल्यात दुसरा पेंग्विन देण्याची मागणी दक्षिण कोरियाच्या क्वक्स अक्वेरियमकडे केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.