Advertisement

'आयएनएस खंदेरी' नौदलाच्या ताफ्यात येणार

शनिवारी २८ सप्टेंबरला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्नी सावित्री सिंह यांच्या हस्ते खंदेरी पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल (कमिशनिंग) होणार आहे.

'आयएनएस खंदेरी' नौदलाच्या ताफ्यात येणार
SHARES

भारतीय बनावटीची स्कॉर्पिअन श्रेणीतील 'आयएनएस खंदेरी' ही पाणबुडी नुकतीच माझगाव डॉककडून नौदलाकडे हस्तांतरीत  करण्यात आली आहे. शनिवारी २८ सप्टेंबरला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्नी सावित्री सिंह यांच्या हस्ते खंदेरी पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल (कमिशनिंग) होणार आहे. 

६ पाणबुड्यांची निर्मिती

माझगाव गोदी इथं खंदेरी पाणबुडीची निर्मिती करण्यात आली आहे. फ्रान्सच्या 'डीसीएनएस' (नेव्हल ग्रुप) या कंपनीसोबत ऑक्टोबर २००५ मध्ये करार झाला होता. स्कॉर्पिअन श्रेणीतील एकूण ६ पाणबुड्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये (एमडीएल) तयार होत आहेत. पाणबुड्यांची भारतात निर्मिती करण्याच्या निर्णयानुसार पहिली पानबुडी २०१३ मध्येच नौदलात दाखल होणं अपेक्षित होतं. 

वर्षभराच्या विलंबानंतर

यापैकी एक पाणबुडी (आयएनएस कलवरी) नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. ही पाणबुडी मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमांडमध्येच तैनात आहे. त्यानंतर आयएनएस खंदेरी जवळपास वर्षभराच्या विलंबानंतर नौदलाच्या ताफ्यात दाखल होत आहे. सर्व प्रकारच्या समुद्री चाचण्या व त्रुटी दूर केल्यानंतर नौदलाच्या ताफ्यात दाखल होणारी खंदेरी पाणबुडीदेखील पश्चिम कमांडअंतर्गतच तैनात असेल. यामुळे या कमांडशीच एमडीएलने गुरुवारी हस्तांतरण करार केला. 

काम प्रगतीपथावर

‘एमडीएल’मध्ये सध्या ८ युद्धनौका आणि ४ पाणबुड्या बांधण्याचं काम सुरू आहे. एमडीएलने ९० च्या दशकात बांधलेल्या आयएनएस शिशूमार या पाणबुडीची कालमर्यादा वाढविण्याचं कामही इथं सुरू आहे. विशाखापट्टणम श्रेणीतील विनाशिका व शिवालिक श्रेणीतील 'स्टेल्थ' फ्रिगेटसारखी महत्त्वाची बांधणीही सुरू असल्याची माहिती एमडीएलकडून देण्यात आली.



हेही वाचा-

माहीम चौपाटीवर पोलिसांचं अत्याधुनिक 'मरीन हेडक्वार्टर'

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लवकरच मुंबई दौऱ्यावर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा